⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Rain Ubdate : राज्यात १० सप्टेंबर पर्यंत बरसणार वरूण राजा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । गेल्या आठवड्याभरापासून गायब झालेला पाऊस आता पुन्हा बरसणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस बरसणार आहे. जळगाव जिल्ह्यातही पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे नागरिक सुखवतील यात शंका नाही.यंदा उशिरा आलेला पाऊस लवकर परतीच्या मार्गाला निघाला आहे. यामुळे शेतकरी राजा दुखावला आहे मात्र येत्या आठवड्याभरात संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात परतीचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

10 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये पाऊस होणार असे म्हटले जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 10 सप्टेंबर पर्यंत जिह्या सह संपूर्ण राज्यामध्ये परतीचा पाऊस होणार आहे. अशावेळी नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. याचबरोबर काही प्रमाणात का होईना पण शेतकरी राजा सुखावणार आहे.

राज्यातील बहुतांश ठिकाणी हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. यंदा राज्यात सरासरी 35 टक्के पर्यंत पाऊस झाला असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे येत्या काळातही तितकाच पाऊस होईल असा अंदाज आहे. राज्यात व जिल्ह्यात शेतकऱ्यांसह नागरिकही पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामुळे बाप्पाच्या आगमनालाच संपूर्ण राज्यात पाऊस होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.