⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | हवामान | Rain News : राज्यात ‘या’ तारखेला बरसणार पाऊस

Rain News : राज्यात ‘या’ तारखेला बरसणार पाऊस

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । राज्यात मागील अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. त्यासह गुरुवारपासून राज्यभरात मान्सून सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. ‘येत्या ३ ते ४ दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ५ व्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करुन दिली आहे.

दरम्यान, रविवारी ( ४ सप्टेबर ) रोजी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात पाऊस झाला. औरंगाबाद, जालना जिल्ह्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तर, ( ५ सप्टेंबर ) मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट सांगितला आहे.६ सप्टेंबर : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, नगर, जालना, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, वाशीम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा चंद्रपूर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या पाऊस पडणार होता.

‘या’ जिल्ह्यांना इशारा
7 सप्टेंबर : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, नगर, जालना औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड.
8 सप्टेंबर : पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली

author avatar
टीम जळगाव लाईव्ह