---Advertisement---
बातम्या महाराष्ट्र

आज महाराष्ट्रातील हवामान कसं असेल? कुठं कुठं पाऊस पडेल? वाचा बातमी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२४ । यंदा वेळेपूर्वी मान्सूनने महाराष्ट्रात एंट्री घेतली असून काही दिवसापासून राज्यातील विविध ठिकाणी दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्याम, आज राज्यातील हवामान नेमकं कसं असेल? आज राज्यात कुठं कुठं पाऊस पडेल, याबाबतची सविस्तर माहिती हवामान विभागानं दिली आहे.

rain jpg webp webp

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात देखील वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

---Advertisement---

राज्याच्या विविध भागात सध्या चांगला पाऊस होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं शेती कामांना वेग आला आहे. मान्सून वेळेत दाखल झाल्यानं शेतकऱ्यांचा खरीप हंगाम यावेळी चांगलाच फुलणार आहे. चांगला पाऊस होताच शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी खरीपाच्या पेरणीच्या तयारीत आहेत. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी देखील केल्याचं पाहायला मिळत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्यानं यावेळी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जोमात असल्याचे पाहायला मिळत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---