गुरूवार, सप्टेंबर 14, 2023

रावेर तालुक्यात पावसाचा हाहाकार : माजी नगरसेवक गेला वाहून

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । रात्रीपासून रावेर शहरासह तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठा हाहाकार उडाला आहे.या पावसामुळे दोन व्यक्ती वाहून गेले आहेत आशी माहीती मिळत आहे. यात बेपत्ता असलेल्यांमध्ये रावेर शहरातील एका माजी नगरसेवकाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

रावेर तालुक्यात काल बुधवारी रात्री अचानक पावसाला सुरुवात झाली. अचानक पावसाने जोर पकडला आणि दोन ते तीन तास मुसळधार पावसाने तांडव केला. यात रावेर तालुक्यातील नागझिरी, अभोडा आणि मात्रान या नद्यांना पूर आल्याने एकच धावपळ उडाली. यात रावेर शहरातील माजी नगरसेवक यांच्यासह एक जण दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. हे दोघे बेपत्ता झाले आहेत.