जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२४ । ब्रेक घेतल्यानंतर आता राज्यातील अनेक भागात पाऊस सक्रिय झाला आहे. मागील दोन दिवसापासून राज्यातील विविध ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. अशातच हवामान खात्याने आगामी पाच दिवसाचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. २३ ते २७ जून दरम्यान महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात यलो अन् ऑरेंज अलर्ट दिला आहे.
उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा वाहणार आहे. त्याचा वेग 40-50 किमी प्रतितास असणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
जवळपास मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापला असून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक जोरदार पावसाची वाट पहात आहेत. मागील दोन दिवसापासून राज्यातील विविध भागात पाऊस होत आहे. जळगाव जिल्ह्यात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात अद्यापही मुसळधार पावसाने हजेरी लावली नाहीय. आज रविवारी आणि उद्या सोमवारी जळगावला पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.