जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२१ । जळगाव जिल्ह्यात ओढ दिलेल्या पावसाने पुन्हा पुरागमन केलं असून गेल्या 3 दिवसांमध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी सुकवला असून वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात पुढील तीन दिवस पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर गेल्या 5 दिवसांपासून जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला आहे. गुरूवारी शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला. प्रदिर्घ खंडानंतर दाखल झालेल्या मान्सूनसासाठी पुढील आठवडा अनुकूल स्थितीचा आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत उत्तर मध्य महाराष्ट्रात पाऊस असेल.
कोकण, गोवा, मराठवाडा आणि देखील पाऊस सक्रिय असेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेतर्फे वर्तवला आहे. दरम्यान, पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मोठी घट झाली आहे. जळगाव जिल्ह्यात तापमान 30 अंशापर्यंत खाली आले आहे. त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.