---Advertisement---
हवामान

शेतकऱ्यांवर पुन्हा अवकाळीचं संकट; जळगावसह या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२३ । एकीकडे राज्यात उन्हाचा कडाका वाढत असून त्यात दुसरीकडे हवामान खात्याने राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने राज्यात 7,8 आणि 9 एप्रील रोजी अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

rain 1 2 jpg webp

या जिल्ह्यांना अलर्ट जारी
लातूर, धाराशीव, नांदेड, संभाजीनगर,अहमदनगर, परभणी,बुलढाणा, जालना, जळगाव, अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये 7 ते 9 एप्रीलदरम्यान वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

---Advertisement---

राज्यात मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने (Rain) आधीच हैराण झालेला शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांवर (Farmer) अवकाळी पावसाच मोठं संकट निर्माण झालं आहे.

दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात पाऊस सुरू आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये आज सकाळ पासूनच पावसाळा सुरुवात झाली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये काल (३ एप्रिल) देखील हलका पाऊस झाला.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) संपूर्ण दिल्ली, एनसीआर आणि गन्नौर, रोहतक, भिवानी (हरियाणा) बरौत, शिकारपूर, खुर्जा (उत्तर प्रदेश) आणि लगतच्या भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याशिवाय किठोर, गढमुक्तेश्वर, हापूर, सियाना, शिकोहाबाद, बुलंदशहर, अनूपशहर, नरोरा, जत्री, अलीगढ, कासगंज, रोहतक, खुर्जामध्ये पुढील काही तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---