⁠ 
सोमवार, एप्रिल 22, 2024

महाराष्ट्रात मान्सून दाखल होताच जळगावसह या जिल्ह्यांना अलर्ट जारी ; 4 दिवस धो-धो बरसणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२३ । ज्या मान्सूनची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते तो अखेर आज म्हणजेच ११ जून रोजी दुपारी महाराष्ट्रात दाखल झाला आहे. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण गोवा मान्सूनने व्यापला असून येत्या चार पाच दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. दरम्यान, मान्सून दाखल होताच राज्यात पुढील चार ते 5 दिवस मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्याला देखील आजपासून दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार आज मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, अहमदनहर, धारशीव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोमवारी राज्यात कुठे पाऊस –
मुंबई, पालघार, ठाणे, नाशिक, अहमदनहर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, बीड, जालना, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंग्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, धुळे, जळगाव, नंदुरबार

New Project 7
महाराष्ट्रात मान्सून दाखल होताच जळगावसह या जिल्ह्यांना अलर्ट जारी ; 4 दिवस धो-धो बरसणार 1

मंगळवारी राज्यातील या जिल्ह्यांना अलर्ट
मंगळवारी राज्यभरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंग्रपूर, गडचिरोल, गोंदिया, भंडारा, नागपूर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

15 जून रोजी काय स्थिती –
नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यत आली आहे. त्याशिवाय उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिली.