⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

राज्यात पुन्हा मुसळधारचा अंदाज ; आज जळगावसह 19 जिल्ह्यांना अलर्ट जारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२३ । जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या शेवटी राज्याला जोडपून काढलं. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये नदी-नाले तुडुंब भरले आणि जनजीवन विस्कळीत झाल्याचंही चित्र होतं. दरम्यान, विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर आज गुरुवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आयएमडी मुंबईने दिलेल्या माहितीनुसार, अनेक भागांमध्ये आज यलो अलर्ट असणार आहे तर पुणे, सातारा, गोंदिया आणि भंडारा या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस होईल तर इतर भागात मात्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज यलो अलर्ट असणार आहे. त्यामुळे या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आज पाहायला मिळेल.

हवामान खात्याकडून अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या भागांमध्ये मात्र कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या भागांमध्ये पावसाची रिपरिप पाहायला मिळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.