जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑगस्ट २०२२ । बंगालच्या उपसागरातील उत्तर पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून या पट्ट्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहेत. दरम्यान हवामान खात्याने राज्याच्या सर्वच भागात पुढील 8 दिवस पाऊस चांगलाच जोर धरणार असल्याचे सांगितले आहे. जळगाव जिल्ह्याला पुढचे पाच दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
राज्यात गेल्या जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं होते. गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने उघडीप दिली. मात्र काल गुरुवारी राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. 11 ऑगस्टपर्यंत राज्यात सर्वदूर पाऊस असल्याचे सांगण्यात आले आहे. कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही 7-8 ऑगस्टला मुसळधारची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुढील पाच दिवस यलो अलर्ट
जळगावसह पालघर, ठाणे, मुंबई, धुळे नंदूरबार, नांदेड, नगर पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, वर्धा वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
ऑरेंज अलर्ट
तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग नाशिक, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाची जिल्हाभरात प्रतीक्षा हाेती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी दुपारी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. पावसाची केवळ रिमझिम हजेरी हाेती. ढगाळ वातावरण आणि श्रावणातील पावसाच्या सरींनी वातावरणात चैतन्य आले. रात्री १० वाजेपासून शहरात अनेक ठिकाणी रिपरिप पाऊस सुरू हाेता.
जळगांव जिल्हा दि05/ 8/2022
अमळनेर-35
बोदवड-1
भडगाव-0
भुसावळ-12.4
पाचोरा-
पारोळा-62
जामनेर-
चोपडा-13
चाळीसगाव-21
रावेर-5
मुक्ताईनगर-7
धरणगाव-5
यावल-12