महाराष्ट्रासाठी पुढचे ३ दिवस महत्वाचे ! १६ जिल्ह्यांना हायअलर्ट; मुख्यमंत्र्यांकडून सतर्क राहण्याचे आवाहन

ऑगस्ट 18, 2025 5:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२५ । सध्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून शेतीचे आणि पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. याच पावासाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन आढावा घेतला.

rn18

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात २१ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला असून १५ ते १६ जिल्ह्यांना पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. कोकण विभागात जास्त पाऊस झाला आहे. कोकणाला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Advertisements

नाशिक विभागात तापी आणि हतनूर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जळगाव जिल्ह्यात बिकट परिस्थिती असून जिल्ह्यातील रावेरसह काही भागात पाणी शिरले आहे. 2-3 दिवसांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. घरांचे आणि गुरांचे नुकसान झालेले आहे. पुण्यात पाऊस पडत आहे मात्र कोणत्याही नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली नाही.

Advertisements

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. काल येथे झालेला पाऊस सुमारे 206 मि.मी. इतका होता. त्यामुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ येथील जनजीवन प्रभावित झाले आहे.

रावनगाव येथे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हसनाळ येथे 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. भासवाडी येथे 20 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. भिंगेली येथे 40 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. 5 नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.

मी स्वत: नांदेड जिल्हाधिकार्‍यांशी सातत्याने संपर्कात असून, नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करीत आहेत. एनडीआरएफची 1 चमू, एक लष्करी पथक आणि पोलिसांची चमू समन्वयातून बचाव कार्य करीत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून सैन्याची एक तुकडी सुद्धा रवाना झाली आहे. स्थानिक प्रशासनाला सातत्याने प्रभावित भागात राहून समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्रात आगामी ३ दिवस कुठे कोणता अलर्ट

१८ ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट –
रेड अलर्ट –
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा,
ऑरेंज अलर्ट-
पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अमरावती,
येलो अलर्ट –
धुळे, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

१९ ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट –
रेड अलर्ट –
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा
ऑरेंज अलर्ट-
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, गडचिरोली
येलो अलर्ट –
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

२० ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट –
ऑरेंज अलर्ट- पालघर, ठाणे, मुंबई, राडगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा,
येलो अलर्ट – रत्नागिरी, सिंदुधुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now