⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | वाणिज्य | छठपूजानिमित्त घरी जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय

छठपूजानिमित्त घरी जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२३ । दिवाळीनंतर आता छठपूजेच्या निमित्ताने घरी जाणाऱ्या प्रवाशांची ट्रेनमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने आणखी सहा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आठ गाड्यांच्या फेऱ्यांमध्येही रेल्वेकडून वाढ करण्यात आली आहे. छठपूजा डोळ्यासमोर ठेवून विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या विशेष गाड्या धावणार
सुरत-सुभेदारगंज एक्सप्रेस (09117-09118) 24 नोव्हेंबरपर्यंत धावेल.
उधना-पाटणा एक्स्प्रेस (०९०४५-०९०४६) २५ नोव्हेंबरपर्यंत धावेल.
समस्तीपूर-अहमदाबाद एक्सप्रेस (०९४१४) २ डिसेंबरपर्यंत धावेल. काही गाड्या आठवड्यातून काही दिवस धावतील.
लोकमान्य टिळक-दानापूर एक्सप्रेस (०१४०९-०१४१०) दर शनिवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार २ डिसेंबरपर्यंत धावेल.
पुणे-दानापूर एक्स्प्रेस (01415-01416) 1 डिसेंबरपर्यंत दर शुक्रवारी धावेल.
पुणे-कानपूर सेंट्रल एक्स्प्रेस (01037-01038) 29 नोव्हेंबरपर्यंत दर बुधवारी धावेल.
पुणे-दानापूर एक्स्प्रेस (०१०३९-०१०४०) दर शनिवारी २ डिसेंबरपर्यंत धावेल.
आनंद विहार टर्मिनस-कटिहार एक्स्प्रेस (०४०४८-०४०४७) १७ नोव्हेंबरपर्यंत धावेल.
आनंद विहार टर्मिनस-जयनगर एक्सप्रेस (०४०५८-०४०५७) १८ नोव्हेंबरपर्यंत धावेल.
आनंद विहार टर्मिनस-पाटणा एक्सप्रेस (०४०६६-०४०६५) दर सोमवार आणि गुरुवारी ३० नोव्हेंबरपर्यंत धावेल.
दिल्ली-बरौनी एक्सप्रेस (०४०६२-०४०६१) २६ नोव्हेंबरपर्यंत दर रविवारी धावेल.
लाल कुआन-कानपूर अन्वरगंज एक्स्प्रेस (०५३०६-०५३०५) २९ डिसेंबरपर्यंत धावेल.
सुभेदारगंज-वांद्रे एक्स्प्रेस (०४१२५-०४१२६) २५ डिसेंबरपर्यंत धावणार आहे.
मुंबई सेंट्रल-कटिहार एक्स्प्रेस (०९१८९-०९१९०) ३० डिसेंबरपर्यंत धावेल.
भगत की कोठी-दानापूर एक्सप्रेस (०४८११-०४८१२) २९ नोव्हेंबरपर्यंत धावेल.
राजकोट-बरौनी एक्स्प्रेस (०९५६९-०९५७०) २९ डिसेंबरपर्यंत धावेल.
साबरमती-दानापूर एक्सप्रेस (०९४०३-०९४०४) २६ नोव्हेंबरपर्यंत धावेल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.