---Advertisement---
गुन्हे भुसावळ

भुसावळातील रस्त्यामुळे दोघे रेल्वे कर्मचारी अपघाताचे शिकार ; दोघांचे हात फॅक्चर

---Advertisement---

 

accident jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । भुसावळ शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दरम्यान, खराब रस्त्यामुळे दोघे रेल्वे कर्मचारी अपघाताचे शिकार झाले असून दोघांच्या हाताला व पायाला जबर मार लागला आहे.

---Advertisement---

डि.आर.एम कार्यालयातील कार्मिक विभागमधील मेडीकल विभागाचे चीफ ओएस गुलाब सोनवणे व सिनियर क्लर्क अविनाश सोनवणे हे मोटार सायकलवरुन जळगांवहुन भुसावळला येत असतांना भुसावळातील भोई नगर जवळ रस्त्यावर कच पडलेला असल्याने अविनाश सोनवणे यांची मोटार सायकल कच वरुण घसरल्याने दोन्ही जण मोटार सायकल वरुन खाली पडले. त्यात दोघांच्या हाताला व पायाला जबर मार लागल्याने त्यांना तेथिल नागरीकांनी त्वरीत  रिक्षामधून  रेल्वे  दवाखाण्यात दाखल केले, दोन्ही जण रेल्वे रुग्णालयात उपचार घेत आहे. हात व पाय फॅक्चर झाल्याने त्यांना प्लास्टर लावण्यात आले आहे.

शहरात रस्त्याची अतिशय दुर्दैवी अवस्था झाली असून दररोज एक ना अनेक  अपघात होत आहेत रस्ते खराब असल्याने नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शहरात अनेक ठिकाणी  पथदिवे सुद्धा नाहीत त्यामुळेही अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---