जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । येथील रेल्वे माथाडी कामगार संघटना तर्फे मागण्या मान्य न झाल्याचा निषेधार्थ प्रशासनाच्या विरोधात दि. १ मे रोजी कामगार दिनी काम बंद आंदोलन करून निषेध करण्यात येणार असल्याचे युनियन चे अध्यक्ष मुकेश बाविस्कर यांनी कळविले आहे.
जळगाव रेल्वे माथाडी कामगार संघटनेच्या वतीने दि. २६ जानेवारी रोजी विविध मागण्यांचे निवेदन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने मंत्री यांच्या उपस्थित मंत्रालयात २२ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत कामगारना आयुक्त यांनी सर्व मागण्या प्रशासनातर्फे मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यावेळी आंदोलन स्थगित करून कामगारांनी प्रशासनावर विश्वास दाखवला होता. परंतु तीन महिने उलटूनही एकही मागणी मान्य न झाल्याने दि. १ मे रोजी कामगार दिनी काम बंद आंदोलन करून निषेध नोंदवणार असल्याचे संघटने तर्फे सांगण्यात आले. बैठकीत युनियन चे अध्यक्ष मुकेश उर्फ आबा बाविस्कर, सचिव राजू, भाट लहू, हटकर भिकान शेख, संतोष हटकर, जोंटी हटकर आदी पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.