विशेष सुचना : कल्याण-कसारा खंडात १३ व १४ मार्चला रेल्वेचा ब्लॉक, ‘या ‘8 गाड्या रद्द

मार्च 12, 2021 10:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कल्याण-कसारा खंडात शनिवार, रविवारी (दि.१३ व १४) असे दोन दिवस रात्री ट्रॅफिक आणि पाॅवर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे ८ गाड्या रद्द, तर दोन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

railway block in kalyan kasara section

शनिवारी रात्री २ वाजेपासून सकाळी ७.२५ वाजेपर्यंत तीन स्टेशनवर हा ब्लॉक असेल. त्यात शनिवारी रात्री २.१५ वाजेपासून ते सकाळी ७.१५ पर्यंत खडावली आणि वाशिंद रेल्वे स्टेशनदरम्यान क्रॉसिंग गेट ६१ मध्ये आरएच गर्डरचे काम केले जाईल. पहाटे २.२५ ते सकाळी ७.२५ या वेळेत आसनगाव आणि आटगाव स्टेशनदरम्यान लेव्हल क्राॅसिंग गेटचे आरएच गर्डरचे काम होईल. तर पहाटे २ ते सकाळी ४.३० पर्यंत शहाडमध्ये एफओबीचे गर्डर टाकले जातील. या कामांमुळे ८ विशेष रेल्वे गाड्या रद्द, तर दाेघांच्या मार्गात बदल आहे. याते अनुक्रमे डाउन मुंबई-अदिलाबाद (दि.१२), अप अदिलाबाद-मुंबई (१३ मार्च), डाउन मुंबई-सिकंदराबाद (दि.१४), अप सिकंदराबाद-मुंबई (दि.१३) डाउन मुंबई-नांदेड (दि.१४), अप नांदेड-मुंबई (दि.१३), अप जबलपूर-कोईमतूर (दि.१३) आणि डाउन कोईमतूर- जबलपूर (दि.१५).

Advertisements

कल्याण आणि टिटवाडा दरम्यान आणि निलजे स्टेशनमध्ये मुंबई-हावडा (दि.१४), एलटीटी-प्रयागराज (दि.१४), एलटीटी-गोरखपूर (दि.१४) आणि मडगाव-नागपूर विशेष गाडी १३ मार्चला थांबवण्यात येईल.

Advertisements

मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील अमरावती-मुंबई ही गाडी १३ मार्चला अमरावती स्टेशनपासून तीन तास रि-शे़ड्युलिंग करण्यात येईल. अप गोंदिया-मुंबई एक्स्प्रेस १३ मार्चला गाेंदिया स्टेशनपासून ३ तास विलंबाने सुटेल.

अप गोरखपूर-एलटीटी विशेष गाडी गाेरखपूर स्टेशनवरून १२ मार्चला जळगाव-वसई रोड मार्गे एलटीटीला जाईल. हावडा-मुंबई विशेष गाडी हावडा स्टेशनवरून १२ मार्चला जळगाव, वसई रोड मार्गे एलटीटी गाठेल. या दोन्ही गाड्यांना भिवंडी रोड येथे थांबा दिला आहे.

इगतपुरी आणि कल्याण स्टेशन दरम्यान १ ते ३ तासांपर्यंत थांबवण्यात येईल. यात नागपूर-मडगाव गाडी (दि.१३ मार्च), हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम (दि.१३), फिरोजपूर-सीएसएमटी (दि.१२), नागपूर-सीएसएमटी (दि.१३) या गाड्यांचा समावेश आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now