⁠ 
शनिवार, जून 15, 2024

WR Mumbai Bharti : रेल्वेत 10वी पाससाठी 3624 रिक्त जागा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रेल्वे रिक्रूट सेल वेस्टर्न रिजन (RRC WR) ने अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी बंपर भरती जाहीर केली असून यासाठीची अधिसूचना निघाली आहे. त्यानुसार 3624 अप्रेंटिसशिप रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 27 जून 2023 पासून सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2023 आहे. अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइट rrc-wr.com ला भेट देऊ शकता.

रेल्वेमधील शिकाऊ प्रशिक्षणासाठी, संबंधित ट्रेडमध्ये ITI सह 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जोपर्यंत वयोमर्यादा संबंधित आहे, ती 15 ते 24 वर्षे आहे.

रिक्त पदांचा तपशील :
1) फिटर/ Fitter
2) वेल्डर/ Welder
3) टर्नर/ Turner
4) मशिनिस्ट/ Mechanist
5) सुतार/ Carpenter
6) पेंटर/ Painter
7) मेकॅनिक (डिझेल) / Mechanic (Diesel)
8) मेकॅनिक (मोटार व्हेईकल)/ Mechanic (Motor Vehicle)
9) PASAA
10) इलेक्ट्रिशिअन/ Electrician
11) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ Electronic Mechanic
12) वायरमन/ Wireman
13) Reff. & AC मेकॅनिक/ Reff. & AC Mechanic
14) पाईप फिटर / Pipe Fitter
15) प्लंबर/ plumber
16) ड्राफ्ट्समन (सिव्हिल)/ Draughtsman (Civil)
17) स्टेनोग्राफर / Stenographer

आवश्यक पात्रता :
अर्ज करणारा उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा. सोबतच संबंधित ट्रेड मध्ये NCVT/SCVT पास असावा.

वयाची अट: 21 जून 2023 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

निवड प्रक्रिया :
आयटीआय अप्रेंटिसशिपसाठी उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. गुणवत्ता यादी हायस्कूल आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित असेल. हायस्कूल आणि आयटीआयच्या गुणांचे वेटेज 50-50 टक्के असेल.

अर्ज फी :
अर्ज शुल्क फक्त 100 रुपये आहे

नोकरी ठिकाण: पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2023 (05:00 PM)
अधिसूचना पहा : PDF

Online अर्ज: Apply Online