⁠ 
सोमवार, मे 6, 2024

ना परीक्षा ना मुलाखत! रेल्वेत थेट 3015 जागांसाठी भरती, फटाफट अर्ज करा

जळगाव लाईव्ह न्यूज ।नोकरी संदर्भ । दहावी पाससह आयटीआय उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. पश्चिम-मध्य रेल्वेत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा ही घेतली जाणार नाहीये. इतकेच नाही तर मुलाखत देखील घेतली जाणार नाहीये. यामुळे इच्छुकांनी फटाफट अर्ज या भरती प्रक्रियेसाठी करावीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 जानेवारी 2024 आहे. WCR wcr.Indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागतील. तब्बल 3015 पदांसाठी ही भरती होणार आहे.

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
विभागीय रिक्त पदाचा तपशील
जेबीपी डिव्हीजनमध्ये 1164 पदे, कोटा डिव्हीजनमध्ये 853 पदे, सीआरडब्ल्यूएस बीपीएलमध्ये 170 पदे, डब्ल्यूआरएस कोटाध्ये 196 पदे , जेबीपी मुख्यालयामध्ये 29 पदे भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट: 14 डिसेंबर 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : General/OBC:₹136/- [SC/ST/PWD/महिला: ₹36/-]

जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online