---Advertisement---
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील भयंकर घटना ! अख्खं गाव झोपेत, तितक्यात कोसळली दरड अन्.. शेकडो लोक ढिगाऱ्याखाली

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२३ । महाराष्ट्रातील रायगडमध्ये पावसाने कहर केला असून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, खालापूर जवळील इरशाळ वाडी येथे दरड कोसळली असून यात या दरडीच्या ढिगाऱ्याखाली ४० घरं दबली गेली आहेत. आतापर्यंत घटनास्थळावरून चार ते पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. शेकडो लोक या ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना काल रात्री घडली असून याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली असून मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे.

raigad news jpg webp webp

खालापूरच्या इर्शालगडावरील चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासींची वाडी आहे. अख्खं गाव झोपेत असताना या गावावर रात्री दरड कोसळली. 

---Advertisement---

मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत चार ते पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच एकूण २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, ढिगाऱ्याखाली जवळपास 100 लोक अडकल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, दुर्घटनास्थळी एनडीआरएफची टीम, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदत कार्य सुरु आहे.  दरम्यान, या घटनेमची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली असून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर केली आहे. तसेच उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनाकडून केला जाणार असल्याचं जाहीर केलं.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---