जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । चाळीसगाव शहरातील कांदा मार्केटजवळ सुरु असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर शुक्रवार दि.१५ रोजी शहर पोलिसांनी धाड टाकून ११ जणांवर कारवाई केली. या ठिकाणाहून साडे सात हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी अकरा जणाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
चाळीसगाव शहरातील कांदा मार्केट जवळील भिंतीलगत पत्यांचा जुगार सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार शहर पोलिसांनी या ठिकाणी शुक्रवार दि.१५ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास धाड टाकून जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली. कारवाईदरम्यान, पोलिसांकडून ७ हजार ४६० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
यांच्यावर झाली कारवाई
जुगार खेळणारे अनिल रामराव देशमुख (वय-५१) रा.पाटणादेवी रोड, रविंद्र वीरभान पाटील (वय-४४) रा. वाघडू, मेहमुद्खान रसुलखान (वय-६०) रा. ख्वाजा चौक, उमेश संतोष हाडपे (वय-३१) रा. पाटणादेवी रोड, अनिल शिवाजी पवार (वय-२५) रा. नागद रोड, पवन सरदारसिंग राजपूत (वय-२३) रा. घाटरोड, राजू किसान भोई (वय-४९) रा. बाजारपेठ, शामकांत देविदास आगोने (वय-३५) रा. पाटणादेवी रोड, सुनील परसुराम मोची (वय-५६) रा. इंधीरानगर, राजेंद्र उर्फ किसन तान्हाजी देशमुख (वय-५८) रा. रिंगरोड व राजेंद्र शिवाजी कोळी (वय-५०) रा. पाटणादेवी आदींवर पोलीस नाईक विनोद खैरनार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांचा होता पथकात समावेश
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस, सागर ढिकले, पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलीस नाईक विनोद भोई, शैलेश पाटील, राकेश पाटील, संदीप पाटील, प्रकाश पाटील, विनोद खैरनार आदींच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास विनोद भोई करीत आहे.