⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जळगावात कुंटनखान्यावर छापा, राजकीय पुढाऱ्याचा नातेवाईक रंगेहात

जळगावात कुंटनखान्यावर छापा, राजकीय पुढाऱ्याचा नातेवाईक रंगेहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२१ । शहरातील आयोध्या नगर परिसरात सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने कुंटनखान्यावर छापा टाकला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका राजकीय पुढाऱ्याच्या नातेवाईकासह महिला, पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जळगावात कुंटनखान्यावर छापा, राजकीय पुढाऱ्याचा नातेवाईक रंगेहात

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२१ । शहरातील आयोध्या नगर परिसरात सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने कुंटनखान्यावर छापा टाकला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका राजकीय पुढाऱ्याच्या नातेवाईकासह ३ महिला, २ पुरुषांना ताब्यात घेण्यात आले आहे.

जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरात असलेल्या सुदर्शन कॉलनीत एका घरात कुंटणखाना चालावला जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. गुरुवारी रात्रीच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्यासह पोलीस कर्मचारी अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, गफार तडवी, सुनील सोनार, हेमंत कळस्कर, चंद्रकांत पाटील, निलेश पाटील, महेश महाले, सहाय्यक अधीक्षक कार्यालयातील रविंद्र मोतीराया हे ८.२० च्या सुमारास सुदर्शन कॉलनीत पोहचले. कुंटनखान्यापासून २०० मीटर अंतरावर पथक थांबले होते.

पोलिसांनी कुंटनखाना सुरू असलेल्या घरात एका बनावट ग्राहक पाठविला असता त्याठिकाणी सुरू असलेल्या सर्व प्रकारची त्यांना माहिती कळाली. सर्व खात्री पटताच पोलीस स्टाफ पंचासह त्याठिकाणी पोहचले. एक महिला अमोल आदिनाथ दारकुंडे रा.शिवाजी नगर, प्रशांत रतन जैन रा.अयोध्या नगर यांच्या मार्फत कुंटनखाना बालगीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

कुंटनखाना चालवणारी महिला तिच्याकडे ग्राहक आणून देणाऱ्या दलालाला ५०० रुपये कमिशन देत होती. तसेच त्याठिकाणी असलेल्या महिलांकडून ती महिला प्रतिग्राहक एक हजार रुपये कमिशन घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या या कार्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून या व्यवसायात आणखी काही महिलांची फसवणूक झाली आहे का? किंवा या मागे कोण कोण आहेत? याचा शोध घेणे सुरू आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.