मोठी बातमी! जळगाव एलसीबी निरीक्षकपदी राहुल गायकवाड, संदीप पाटलांची उचलबांगडी

ऑगस्ट 29, 2025 8:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्हा पोलीस दलात एक खळबळ उडवून देणारा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला. त्यांनी एलसीबीचे निरिक्षक संदीप पाटील यांनी एका महिलेचे शोषण केल्याचा आरोप केला.

Maharashtra Police Bharati 2022

यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी तत्काळ आदेश काढून पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल बाबासाहेब गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी एलसीबीचे प्रमुख पोलीस निरिक्षक संदीप पाटील यांनी एका महिलेला विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचे प्रकरण उपस्थित केले. यानंतर संदीप पाटील यांच्यावर एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दुसरीकडे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सायंकाळी आदेश काढून संदीप पाटील यांची एलसीबीच्या प्रमुख पदावरून उचलबांगडी करून त्यांना नियंत्रण कक्षात पाठविले. तर त्यांचा प्रभार हा जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असणारे राहूल गायकवाड यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now