जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील चितोडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. यात राधिका पंकज वारके यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाली आहे.

मावळते उपसरपंच प्रदीप धांडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी दि ८ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सरपंच अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत उपसरपंचपदासाठी राधिका पंकज वारके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यांची होती उपस्थिती?
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कुरकुरे, चंद्रकांत जंगले, मावळते उपसरपंच प्रदीप धांडे, योगेश भंगाळे, बेबीबाई कडू पाटील, सिंधूबाई ज्ञानदेव टोंगळे, हर्षा गोकुळ पाटील, उज्ज्वला संदीप पाटील उपस्थित होते.






