जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२१ । शिरसाड ( ता.यावल ) येथील सरपंचांना उद्देशून गावातील एकाने विनाकारण जातीवाचक शब्द उच्चारले. ही घटना सोमवारी दुपारच्या या घटनेप्रकरणी यावल पोलिसांत ऑट्रॉसिटीचा विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर असे की, शिरसाड येथील सरपंच दीपक वामन इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते सोमवारी दुपारी साडेतीन वाजता गावातील पाण्याचे टाकीजवळ इलेक्ट्रिक मोटारीच्या स्टार्टरचे काम करत होते. तेथे गावातील रहिवासी सचिन सुरेश कोळी याने फिर्यादीला उद्देशून तुला सरपंच कोणी केले? असा वाद मुद्दाम उकरून काढला. सरपंचाने त्याला वारंवार समजावून सांगितल्यावर देखील त्याने जातीवाचक शब्द उच्चारले. याप्रकरणी यावल पोलिसांत ऑट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फैजपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, सहाय्यक फौजदार महेंद्र पाटील करत आहे.
हे देखील वाचा :