⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | अंतूर्ली येथील ज्ञानपूर्णा महाविद्यालयाचे बी. आर.पाटील सेवानिवृत्त

अंतूर्ली येथील ज्ञानपूर्णा महाविद्यालयाचे बी. आर.पाटील सेवानिवृत्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जून २०२१ । ज्ञानोदय मंडळ अंतूर्ली संचलित ज्ञानपूर्णा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ईच्छापुर निमखेडी या शाळेचे प्राचार्य ह.भ.प.भाऊराव महाराज (बी. आर.पाटील सर) हे प्रदीर्घ सेवेनंतर दि.३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले.

त्यांना भावी जीवनाच्या हार्दिक शुभकामना देवून सत्कार करतांना ज्ञानोदय मंडळाचे संस्थापक अध्यक्ष एस.ए.भोई सर, आर.जी.डी.विद्यालय कर्कीचे शालेय समितीचे चेअरमन अनिल वाडीले, कर्की हायस्कूलचे मा.मुख्याध्यापक बी. एस.वानखेडे सर, एम.एफ.टी. विद्यालयाचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक सुभाष भोई सर, ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयाचे संचालक नामदेव भोई, पिक संरक्षण सोसायटीच्या संचालिका सौ.चीमाबाई भोई, कर्की हायस्कूलचे नाईक सुभाष सुर्यवंशी यांनी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी ज्ञानोदय मंडळाचे संचालक शरद महाजन, रवींद्र महाजन, सुमनबाई भोई, कार्यवाह लीलाबाई पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

इच्छापुर निमखेडी येथील ज्ञानपूर्णा विद्यालयात प्राचार्यपदी सेवाजेष्ठतेनुसार कर्की विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.एम.महाजन सर यांची नेमणूक अध्यक्ष एस.ए. भोईसर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली. तसेच कर्की येथील आर.जी.डी.विद्यालयात सेवाजेष्ठतेनुसार एस.के.तायडे यांची पर्यवेक्षक पदी नेमणूक मंडळाचे अध्यक्ष यांनी नियुक्तीपत्र देऊन केली. व त्यांना सर्व संचालक मंडळातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.