---Advertisement---
जळगाव जिल्हा जळगाव शहर महाराष्ट्र

जळगावची दर्जेदार केळी ७० रुपये डझन !

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२३ । देशात जळगावच्या केळीची मागणी वाढली असली तरी पुरवठा कमी होत असल्याने केळी २२०० रुपये किंटल या दराने केळी शेतकऱ्यांकडून खरेदी केली जात आहे. बाजारात दर्जेदार केळी ७० रुपये डझन या दराने विक्री होत आहे. (rate of jalgaon banana)

banana cmv

केळीच्या वाढलेल्या या दरामुळे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण हा विक्रमी भाव असल्याचे उत्पादक सांगत आहेत. गेल्या काही महिन्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना विविध संकटाच्या मालिकेला सामोरे जावे लागले. यात चक्री वादळ, गारपीट आणि अनेक कारणाने उत्पादनही घटले (indian banana rate)

---Advertisement---

सीएमवी वायरसचा झालेला प्रादुर्भाव याचा थेट परिणाम केळीवर झाला. केळीवर पडल ेल्या सीएमवी व्हायरस या आजारामुळे एकूण क्षेत्रापैकी ज ळ गाव जिल्हयात पंधरा ते वीस हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. त्यामुळे केळी उत्पादन कमी प्रमाणात होत आहे. त्याच बरोबर यंदा थंडीचा लांबलेला सिझन हा सुद्धा केळी निसावनीसाठी अडचणीचा ठरला. यामुळे केळी उत्पादनात मोठी घट आली आहे. (rate of banana)

जळगावच्या केळीला मागणी वाढली आहे, तर उत्पादन कमी असल्याने पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने केळीच दर वाढले आहेत. ऑगस्ट महिन्यात १२०० रुपये क्विंटल एवढे दर मिळत होते. त्यापूर्वीच्या काही दिवसांचा विचार केला तर ७०० आणि ८०० रुपये क्विंटल या दराने केळी व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जात होती. गेल्या महिन्यांपासून हे दर स्थिर असल्याने लागवडीचाही खर्च निघत नसल्याने केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. मात्र आता केळीचे दर २२०० रुपये क्विंटलपर्यंत पोहचले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---