प्रा. डॉ. पाटील राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । रावेर येथे शेतकर्यांच्या समृद्धीसाठी हे ब्रिद असलेल्या साप्ताहीक कृषिसेवक’च्या माध्यमातून कृष्णा पाटील व कुटूंबियांनी सात वर्षापूर्वी सुरु केलेल्या उपक्रमांतर्गत गेल्या चार वर्षांपासून राज्यस्तरीय कृषिसेवक पुरस्कार देण्यात येतात. या वर्षीच्या वर्धापनदिनानिमित्त २० रोजी आदर्श कृषि शास्त्रज्ञ या गटांमधून डॉ.उल्हास पाटील कृषि महाविद्यालय जळगावचे प्राचार्य व कृषि शिक्षण परीसराचे संचालक प्रा. सुधाकर मधुकर पाटील यांना बांधावरील कृषि शास्त्रज्ञ असे संबोधून राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानि करण्यात आले.
रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते प्रा.सुधाकर पाटील यांना सपत्निक सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेरचे माजी आमदार व प्रगतिशिल शेतकरी मा.अरुण पाटील हे होते. तर उद्घाटक म्हणून जळगाव जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील होत्या. जैन इरिगेशन सिस्टीमस्चे उपाध्यक्ष डॉ.के.बी.पाटील हे प्रमुख अतिथी होते. यावेळी कृषिसेवकचे संपादक कृष्णा पाटील, पत्रकार तुषार वाघुळदे, कृषि विभागाचे पदाधिकारी. नागपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष, केळी कामगार नेते तसेच परीसरातील वेगवेगळे अधिकारी यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा पाटील, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्यांचे चिरंजीव व तरूण सहकार्यांनी सहभाग दिला.
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक