जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२५ । दर वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमीवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी होते.याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’निमित्त पुणे-नागपूर-पुणे विशेष रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या एक्स्प्रेसला जळगाव आणि भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आल्याने जिल्ह्यातील अनुयायांना दिलासा मिळाला आहे.

गाडी क्रमांक ०१२१५ (पुणे-नागपूर) १ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी पुणे स्थानकावरून सुटेल. तर त्याच दिवशी रात्री ११ वाजून ७ मिनिटाने जळगावला पोहोचेल. तर भुसावळला ११ वाजून ४२ मिनिटाने यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी नागपूर स्थानकात पोहोचेल

तर गाडी क्रमांक ०१२१६ (नागपूर -पुणे) गाडी २ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता नागपूर स्थानकावरून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होऊन दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ४ वाजून २० मिनिटांनी पुणे स्थानकात पोहोचेल. रेल्वे विभागाने गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने नियोजन केले आहे. तसेच प्रवाशांसाठी विशेष व्यवस्था केली असून, प्रवाशांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत, असे आवाहन मध्य रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.
या स्थानकांवर असेल थांबा?
दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा आणि अजनी या मार्गे पुणे-नागपूर-पुणे ही विशेष रेल्वे धावणार आहे. या गाडीला १८ डबे असून, १६ डब्यांना आरक्षण असणार नाही.








