जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२३ । येत्या काही दिवसांमध्ये शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागणार आहे. यामुळे अनेक जण गावी जाण्याचा प्लॅन करतात. मात्र या दरम्यान, रेल्वेगाड्यांनाही गर्दी असते. होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेकडून विशेष गाड्या चालविल्या जातात. अशातच पुणे ते अमरावती विशेष गाडी चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
पुणे-अमरावती स्पेशल एक्स्प्रेस गुरुवार (ता. ६)पासून पुण्याहून सुरू झाली आहे.ही गाडी मनमाडला रात्री नऊ वाजून ५५ मिनिटांनी येईल. भुसावळला सकाळी सहाला, शेगावला पावणेसातला, अकोल्याला ८.४०, बडनेरा रेल्वेस्थानकावर सकाळी दहाला, अमरावतीला सकाळी अकराला पोचेल.
तसेच अमरावती-पुणे स्पेशल एक्स्प्रेसही गुरुवारपासून अमरावतीवरून सुरू झाली आहे. अमरावतीवरून ती सायंकाळी सहाला निघेल. बडनेरा रेल्वेस्थानकावर सायंकाळी सव्वासहाला, अकोला सव्वासातला, शेगावला पावणेआठला, भुसावळला रात्री साडेनऊला पोचेल. रात्री साडेबाराला मनमाडला पोचेल.