जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । केसीई पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी आणि रिसर्च महाविद्यालयात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष. डी.टी. पाटील व प्रमुख पाहुणे क.बा.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रा. आर एस पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे, पी. आर. एस. समन्वयक प्रा. जावेद खान, आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. संदीप पाटील हे उपस्थित होते
प्रोस्पेक्टिव्ह रिसर्च स्कीम या विज्ञान पदव्युत्तर विद्यार्थी लिखित पुस्तकाचे प्रकाशन क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान विभागाचे अधिष्ठाता आणि पूज्य साने गुरुजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या पुस्तकात समाजातील विविध विषयांवर आधारित शोध निबंध सादर करण्यात आले आहेत. यात प्रमुख्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी जैविक खतांचा वापर, औषधातील प्रतिजैविकां बद्दल जागृकता, कोविंड विषाणू संदर्भातली जाणीव, कापूस उत्पादन, सोशल मीडिया इत्यादी विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
डॉ.आर. एस. पाटील यांनी या पुस्तकात शोध निबंध सादरकरणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व गुणवंत विद्यार्थ्यांना भावी जीवनाबद्दल शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमा निमित्त महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात. रसायनशास्त्र विभागातील कुमारी. निशा वर्मा हिचा सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे यांनी सत्कार व कौतुक केले.महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील वैष्णवी ढाके, विद्या कोल्हे रसायनशास्त्र विभागातील निशा वर्मा, पाटील धीरेन, सांख्यिकी विभागातील राजेश्वरी जाधव, अंकिता चव्हाण या प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जावेद खान यांनी केले, प्रा. संदीप पाटील यांनी पाहुण्यांचे आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.