⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

आधी किती निधी खर्च केला याचा पुरावा द्या ; मगच अधिकचा निधी मिळेल

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२३ । शासनाने शहरातील रस्ते कामासाठी ४२ कोटीचा निधी मंजूर केला आहे, त्यापैकी १४ कोटीचा निधी देण्यात आला आहे. त्या निधीतून किती कामे झाली आहेत. याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विदया गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र देवून मागितली असल्याचे सांगण्यात आले.

शासनाने जळगाव शहरातील ४९ रस्त्याच्या कामासाठी ४२ कोटी रूपयाचा निधी महापालिकेला मंजूर केला आहे. मात्र त्याचे काम शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. शासन महापालिकेला पैसे पाठवित आहे, महापालिका झालेल्या कामाअतंर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी देत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मक्तेदाराकडून काम करून घेत आहे.

४२ कोटीच्या या रस्त्याच्या कामासाठी आतापर्यंत महापालिकेने १४ कोटी रूपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा निधी मक्तेदारास दिला आहे. मक्तेदाराने त्या निधीतून रस्त्याची कामे सुरू केली आहेत. या कामासाठी निधी खर्च झाल्याने पुढील कामासाठी मक्तेदाराने निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकडे निधीची मागणी केली आहे. तर महापालिका शासनाकडे मागणी करणार आहे. मात्र नवीन निधी देण्याअगोदर शासन अगोदर जो १४ कोटीचा आले. निधी दिला त्यातून काय काम झाले ?याची माहिती मागवित आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले असून १४ कोटीच्या निधीतून किती कामे झाली याची माहिती द्या असे पत्र दिले आहे.

मात्र अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाने ते पत्र महापालिकेस दिले नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत अधिक माहिती घेतली असता, मक्तेदाराने ४९ रस्त्यापैकी ३५ रस्त्याचे काम केले आहे. त्यापैकी २७ रस्त्याचे बीएमचे काम पूर्ण झाले आहे. त्यावर आता कारपेट टाकण्याचे काम बाकी आहे, आता पुढील काम करण्यासाठी त्यांना निधी आवश्यक असल्याचे बांधकाम विभागाच्या