लसीकरणासाठी तहसीलदारांना याद्या द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे प्राचार्यांना निर्देश
जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२१ । दिवाळीपूर्वी सुरू करण्यात आलेले महाविद्यालयीन तरुणांसाठीचे युवा स्वास्थ्य अभियान अयशस्वी झाल्याने १५ नोव्हेंबरपासून पुन्हा राबवण्यात येणार आहे. या अभियानासाठी जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांना लसीकरण बाकी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी दोन दिवसांत त्या-त्या तहसीलदारांकडे देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत देण्यात आले.
जिल्ह्यात २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरदरम्यान लसीकरण बाकी असलेल्या महाविद्यालयीन युवकांसाठी विशेष मिशन युवा स्वास्थ्य अभियान राबवण्यात आले परंतु, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ते अभियान पुन्हा १५, १६आणि १७ नोव्हेंबरदरम्यान राबवण्यात येणार आहे. या अभियानाची परिणामकारकता वाढवण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या दृष्टीने सोमवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बैठक घेतली. त्यात आरोग्य यंत्रणेसह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांतील १८ वर्षांवरील पात्र लाभार्थीं व लस न घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांकडे दोन दिवसांत देण्याचे निर्देश देण्यात आलेआहेत. यामुळे मात्र, लसीकरण माेहिमेला वेग येणारआहे.