⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

अभिमानास्पद : पोलिसांमुळे पालकांना मिळाली हरवलेली बालके परत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रायपूर कुसुंबा गावातील कार्तीक जयसिंग परदेशी (6) व प्रियांशु अजयकुमार वर्मा (4) ही दोन्ही बालके खेळताना गुरुवारी सकाळी 11 वाजता बेपत्ता झाली. अचानक हरवलेल्या बालकांमुळे त्यांचे पालक हवालदिल झाल्यानंतर पालकांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला माहिती कळवली.

कार्तीक हा बालक मूकबधीर असल्याची पालकांची चिंता अधिकच वाढली होती. बालकांचा शोध सुरू असताना कानळदा रस्त्यावरील लक्ष्मीनगर येथील रहिवासी रीजवान शेख गणी यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क करीत हरवलेल्या बालकांची माहिती दिल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी ताबा घेत या पालकांना कुटूंबियांच्या ताब्यात दिल्याने कुटूंबीयांनी बालकांनी छातीशी कवटाळत एमआयडीसी पोलिसांचे आभार मानले.

गुरुवार, 18 मे 2023 रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दोन अनोळखी बालके खेळताना हरवली व चालत-चालत एमआयडीसी परीसरातील साईनगर परीसरात फिरताना दिसून आल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना माहिती कळवताच पोलीस निरीक्षक् जयपाल हिरे यांच्या पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, हवालदार ईम्तीयाज खान, ईम्रान सैय्यद, सचिन पाटील, महिला पोलीस नाईक निलोफर सैय्यद, साईनाथ मुंढे आदींनी चिमुकल्यांचा ताबा घेतला. दरम्यान, मन्यारखेडा रस्त्यावर दोन्ही बालके कासावीस झाल्याने रडत असताना सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी दोन्ही बालकांना खाऊ देत त्यांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत हात फिरवून त्यांना शांत केले.

बालकांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पालक येतात त्यांना पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह रीजवान शेख यांच्या उपस्थितीत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.