⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | डोंगराच्या काळ्या मैनेची कमाल, मुक्ताईनगरचा शेतकरी झाला मालामाल

डोंगराच्या काळ्या मैनेची कमाल, मुक्ताईनगरचा शेतकरी झाला मालामाल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२१ । मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथील मंगेश जयवंत पाटील या शेतकऱ्याने कोरोना काळ आणि दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही तब्बल १२ एकर शेतीवर करवंदाची लागवड करत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतलं आहे. डोंगराची काळी मैना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या करवंदांना दिल्ली आणि कोलकाता येथील बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे दुष्काळ असूनही मंगेश पाटील मालामाल झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यात करवंदाची लागवड करणारे मंगेश पाटील हेएकमेव शेतकरी आहेत. परिसरातील २०० मजूर देखील या शेतात नेहमी राबत असतात. एकीकडे दुष्काळजन्य परिस्थिती पावसाळाही कमी प्रमाणात होत असल्यामुळे रब्बी, खरिपाचे पिकांनाही पाहिजे तसे उत्पन्न सध्या येत नाही.

दुसरीकडे कोरोना असल्याने इतर भाज्यांची आवक वाढल्याने बाजारात हवा तसा भाव मिळत नाही त्यामुळे अनेक शेतकरी हवालदिल आहेत. अशातच मंगेश पाटील यांनी करवंदाची लागवड करत लाखो रुपयांचे उत्पन्न घेतल्यामुळे इतर शेतकऱ्यांसमोर देखील एक नवीन आशा निर्माण झाली आहे.

करवंद लागवडीची माहिती आणि प्रशिक्षण घेऊन इतर शेतकऱ्यांनी देखील करवंदाची लागवड करावी असे आवाहनही मंगेश पाटील यांनी केले आहे.

मंगेश पाटील यांनी ८ हजार करवंदाची वृक्ष लागवड केली आहे. कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव यावर येत नसून द्राक्षासारखं पिक आपण घेऊ शकतो इतर शेतकऱ्यांनी याकडे वळावे, असा सल्ला मंगेश पाटील यांनी दिला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.