⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | बहिणाबाई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा प्रा.ई.वायुनंदन यांनी स्वीकारला पदभार

बहिणाबाई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा प्रा.ई.वायुनंदन यांनी स्वीकारला पदभार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा पदभार प्रा.ई.वायुनंदन यांनी आज मावळते कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडून स्वीकारला.

 

मावळते कुलगुरू प्रा. पी.पी. पाटील यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे कुलगुरू पदाचा राजीनामा पाठवला होता.  त्यामुळे राज्यपालांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांची नियुक्ती केली होती.   सोमवार ८ मार्च रोजी सकाळी प्रा.पी.पी.पाटील यांच्याकडून प्रा.वायुनंदन यांनी पदभार स्वीकारला.

 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी नुकत्याच झालेल्या ऑनलाईन परीक्षा शंभर टक्के यशस्वी करून दाखविल्या. आपण  मीतभाषी असून बोलण्यापेक्षा कामावर अधिक विश्वास आहे. या विद्यापीठाने तंत्रज्ञानात प्रगती केलेली असून सर्वांना एकत्र व सोबत घेऊन काम केले जाईल, असे प्रभारी कुलगुरू म्हणाले आहे.

 

प्रारंभी प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही पवार यांच्या हस्ते प्रा.पी.पी.पाटील व प्रा.वायुनंदन यांचा शाल, स्मृतीचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. श्रीमती वायुनंदन यांचा सत्कार व्य.प सदस्य डॉ.प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. प्र-कुलगुरू प्रा.पी.पी.माहूलीकर यांचा कार्यकाळ देखील प्रा.पी.पी.पाटील यांच्या सोबत संपुष्टात आल्यामुळे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांच्या हस्ते प्रा. माहुलीकर यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्राचार्य आर.पी. फालक, प्रा.मोहन पावरा, दीपक बंडू पाटील, प्रा.जितेंद्र नाईक, डॉ. प्रिती अग्रवाल, अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी, प्राचार्य पी.पी.छाजेड, प्राचार्य डॉ.प्रमोद पवार, प्राचार्य डॉ. अशोक राणे, प्राचार्य व्ही.आर.पाटील, प्रा.संजय शेखावत, प्राचार्य बी.युवाकुमार रेड्डी, एस.आर.गोहील आदी उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.