⁠ 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
Home | जळगाव जिल्हा | अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशाकरीता प्रक्रीया सुरु

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशाकरीता प्रक्रीया सुरु

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२४ । राज्यात अनुसुचित जमातीतील साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. उच्च शिक्षणात प्रामुख्याने इंग्रजीचा वापर जास्त होत असल्याने अनुसूचित जमातीचे विद्यार्थी उच्च शिक्षणात मागे पडत आहेत व उच्च शिक्षणाच्या बदलेल्या वातावरणात त्यांना जुळवून घेणे कठीण जाते. जागतिकीकीणाच्या सध्याच्या वातावरणात इंग्रजीचे महत्व वाढत असून, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी माध्यमाकडे थोडया प्रमाणात वाढत असला तरी शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत िाक्षण घेणे त्यांच्या आर्थिक कुवती पलीकडे आहे. त्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्याथ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याच्या संधी मोठया प्रमाणात उपलब्ध करुन देणे आवश्यक झाले आहे. त्या पार्श्वभूमीवी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये सन 2024-25 मध्ये प्रवेा देण्यात येणार आहे.

प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल या कार्यालयामध्ये कार्यक्षेत्रातील जळगाव जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या मुलांना इयत्ता 1 ली व 2 री साठी विद्यार्थ्यांना सन 2024 – 25 मध्ये शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत शासन निर्णयानुसार व अटी – शर्तीनुसार प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विहित नमुन्यातील अर्ज खालील ठिकाणी दिनांक 21 मे, ते 10 जून, 2024 या कालावधीत कार्यालयीन वेळेत व सुट्टीचे दिवस वगळून जमा करण्यात यावेत

प्रवेश अर्ज जमा करण्याचे ठिकाण
आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह – यावल/ भुसावळ, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर/ बोदवड, जामनेर, जळगाव/ धरणगाव, चाळीसगाव, एरंडोल/ पारोळा/ भडगाव/ पाचोरा, अमळनेर या ठिकाणी सकाळी 10.30 ते 5 वाजेपर्यंत

या योजनेतंर्गत ज्या पालकांनी आपल्या पाल्यास इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत इयत्ता 1 ली व 2 च्या वर्गात प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी प्रवेश अर्जासाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल, जि. जळगाव येथे प्रत्यक्ष पाल्याचा जन्मदाखला व आधारकार्ड सांक्षाकित प्रत सादर केल्यानंतर इयत्ता 1 ली साठी जन्मदाखला ग्रामसेवक, इ. 1 ली प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय 31 डिसेंबर 2024 रोजी किमान 6 वर्षे पूर्ण असावे, जन्म 1 जून, 2017 ते 31 डिसेंबर, 2018 या दरम्यान झालेला असावा. इयत्ता 2 री साठी इयत्ता 1 ली मध्ये शिकत असल्याबाबत मुख्याध्यापकांची शिफारस, पालकाचे वार्षिक उत्पन्न 1.00 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे तसेच पालक शासकीय / निमशासकीय सेवेत नसावे, उत्पन्नाचा दाखला प्रत जोडणे आवयक, उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा सन 2023-24, पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र ( सक्षम अधिकाऱ्यांने दिलेले), दारिद्रयरेषेखालील असेल तर यादीतील अनुक्रमांक नमुद करुन ग्रामसेवक यांचा दाखला, महिला पालक विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्ता असल्यास ग्रामसेवकाचा दाखला, विद्यार्थ्यांचे पासपोर्ट साईज दोन फोटो, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड छायांकित प्रत, निवड केलेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चिती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांच्या व पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही याबाबत पालकाचे हमीपत्र, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

संपर्काकरीता दुरध्वनी क्रमांक –
1) श्रीमती एम. आर. सुलताने मॅडम (क.शि.वि.अ) मो नं- 9021205520/7798802394
2) श्री. गायकवाड सर (क.शि.वि.अ) मो नं- मो.न- 8788534307

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.