जळगाव लाईव्ह न्यूज|30 मे 2024| राज्यभरात गेल्या आठवड्याभरा पासून सुरू असलेल्या मनुस्मृतीच्या शालेय शिक्षण अभ्यासक्रमातील सहभागावरून अनेक ठिकाणी निषेध आंदोलन चांगलीच तापली आहेत. अशातच राष्ट्रीय काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये मनुस्मृती दहन केले. मनुस्मृती दहन करत असताना आव्हाड यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर देखील फाडलं गेलं.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्याचा जागी मनुस्मृती धहनाचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र कार्यक्रमात निषेध करत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेले पोस्टर त्यांनी फाडले, त्यांच्या या कृतीचा राजकीय पक्षांसह वंचित बहुजन आघाडीने देखील ट्विटच्या माध्यमातून जाहीर निषेध केला आहे.
आव्हाडांच्या अटकेची मागणी
ह्या प्रकारानंतर राजकीय पक्षांनी जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची मागणी देखील केली. जितेंद्र आघाडी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला आहे हा फक्त आंबेडकरांचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा अपमान आहे. त्यामुळे जितेंद्र आघाडी यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी राजू वाघमारे यांनी केली आहे. एकीकडे जय भीम म्हणायचे आणि दुसरीकडे असे कृत्य करायचे, आणि हे केल्यानंतर माफी मागायची हे सगळं नाटक आहे. आव्हाड यांची माफी म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. राज्य सरकार त्या गोष्टी अभ्यासक्रमात घेणार नाही तरीही त्यांनी हा स्टंट कशासाठी केला, असे म्हणत राजू वाघमारे यांनी आव्हाडांच्या अटकेची मागणी केली आहे.
जितेंद्र आव्हाडांची माफी
याप्रकरणी आव्हाडांनी माफी मागत मनुस्मृति दहन करण्याकरिता आम्ही महाड येथे आलो, मात्र मनुस्मृती पुस्तक फाडत असताना अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर चुकून फाडले गेले. त्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे त्यांच्या लक्षातच आले नाही. हे पोस्टर फाडण्यामागे दुसरा कोणताही हेतू न होता,मात्र कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. हे मुद्दामून केलं नाही, विरोधकांनी काय राजकारण करायचं आहे ते करतील, ते खूप काही मागणी करतील. परंतु यावर मी अधिक काही बोलणार नाही, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. अशी दिलगिरी व्यक्त करत जितेंद्र आव्हाड यांनी घडलेल्या घटनेवर वंचित बहुजन समाज व इतर सर्वच नागरिकांची माफी मागितली.