⁠ 
रविवार, मे 19, 2024

विमान प्रवासापेक्षा खासगी बसचे दर जास्त ; जळगाव ते पुणे तिकीट दर पहा..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२३ । दिवाळी सणाला सुरुवात होत असून याच दरम्यान गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. याचाच फायदा घेत खासगी बस वाहतूकदारांनी तिकीट दरात भरमसाठ वाढ केली आहे. पुणे ते जळगाव प्रवासाचा तिकीटदर ४०० ते ९०० रुपयांवरून थेट २ हजार ते २ हजार ५०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. हे दर विमान प्रवासापेक्षाही अधिक असल्याचे बोलले जात असून दिवाळीतील गर्दीमुळे खासगी बस वाहतुकीचे चांगभले होत असून सामान्य प्रवाशांचे दिवाळे निघत आहे.

दिवाळी सणामुळे अनेक जण आपल्या गावी जातात. त्यासाठी रेल्वे तिकीटांची बुकींग तीन महिन्यांपूर्वी काही जणांनी करुन ठेवली आहे. परंतु अनेकांना रेल्वे तिकीट मिळाले नाही. त्यांना नाइलाजास्तव खासगी प्रवासी वाहनांकडे वळावे लागत आहे. मात्र याचाच फायदा घेत खासगी बसच्या तिकीट दरात भरमसाट वाढ करण्यात आली आहे.

पुणे ते जळगाव प्रवासाचा तिकीटदर ४०० ते ९०० रुपयांवरून थेट २ हजार ते २ हजार ५०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. परंतु जळगाव ते पुणे तिकीट दर ४०० रुपये आहे. पुणे ते नागपूर तिकीटाचे दर ३५०० ते ४००० रुपयांपर्यंत आहे. तसेच नागपूर ते पुणे तिकीट दर ६०० ते ७०० रुपये आहे. पुण्यावरुन गावी जाणाऱ्या लोकांची असलेल्या गर्दीमुळे तिकीट दर दुप्पटीपेक्षा जास्त वाढले आहे तर गावावरुन पुण्याकडे येणारे कोणी नसल्यामुळे तिकीट दर कमी आहे.

पुणे येथून जळगाव किंवा नागपूर जाण्यासाठी कमी रेल्वे असल्याचा फायदा खासगी बस वाहतूक करणारे घेत आहेत. जळगाव पुणे विमानसेवा नसली तरी जळगाव-मुंबई, जळगाव- पुणे विमान प्रवासासाठी २ हजार ३०० ते २ हजार ५०० रुपयांचे तिकीट आहे. यामुळे बसपेक्षा विमानप्रवास स्वस्त आहे, असे म्हणावे लागले.