गुन्हेमहाराष्ट्र

बुलढाण्यात पुन्हा अपघात ; प्रवाशांनी भरलेली खाजगी बस पलटली, आठ प्रवासी जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२३ । बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावरील काही महिन्यापूर्वीच्या अपघाताच्या आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एक अपघात झाला. बस चालकाला झोप आल्याने भरधाव बसवरील नियंत्रण सुटून बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली. ही घटना बुलढाण्यात जुन्या मुंबई-पुणे-नागपूर महामार्गावर सुलतानपूर नजिक घडली. या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.

साई अमृत ट्रॅव्हल्सची बस पुण्याहून नागपूरकडे जात होती. सकाळी 7.15 वाजता अपघात झाला. बसमध्ये 35 प्रवासी होते. अनियंत्रित होऊन बस सुरुवातीला झाडाला धडकली आणि नंतर पलटी झाली. अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलीस आणि स्थानिकांनी जखमी प्रवाशांना मदत केली. जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील उपचारासाठी औरंगाबाद इथे नेण्यात येणार आहे. तर लोणार तालुक्यातील बीबी-मांडवा मार्गावर गुरुवारी एसटी बस आणि शाळकरी मुलांच्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये चालकासह 17 मुलं जखमी झाले आहे. काल सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात. जखमींना उपचारांसाठी जालन्यात हलवण्यात आलं आहे.

सहकार विद्यामंदिर शाळेतील मुलं दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी जात होती. परंतु त्याचवेळी मांडवा गावाजवळ एसटी बस चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट शाळकरी मुलांच्या वाहनाला धडकली. या अपघातात चालकासह 17 मुलं जखमी झाली आहेत. अपघातातील जखमी मुलं ही 6 ते 16 वर्षे वयोगटातील आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button