⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

अनिल पाटीलांच्या त्या दाव्याचा पृथ्वीराज चव्हाणांनी घेतला खरपूस समाचार; म्हणाले…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२४ । राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे कधीही काँग्रेसला धोका देऊ शकतात, असा दावा केला आहे. यावर माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अनिल पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

आम्ही सर्व पक्ष ताकदीने लढणार असून आमच्यात कुणी भांडण लावण्याचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्यायचा असेल तर हे अन्यायकारी भ्रष्ट सरकार घालवले पाहिजे. महाविकास आघाडीत मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ असे काही नाही. राज्य सरकारचा जर पराभव करायचा असेल तर लोकसभा निवडणुकीच्या विजयाने कार्यकर्त्यांनी होळून जाऊ नये. केंद्राच्या राजकारणापेक्षा राज्याच्या राजकारणातील विषय हे वेगळे आहेत. म्हणून आम्हीच संपूर्ण ताकतीने छोट्या पक्षांना घेऊन ही निवडणूक लढणार आहेत, असे यांनी पृथ्वीराज चव्हाण म्हटले आहे.

…म्हणून आम्ही 288 जागांबाबत अर्ज मागवून घेतले
आम्हाला आमची ताकद वाढवायची आहे. म्हणून आम्ही 288 जागांबाबत अर्ज मागवून घेतले आहेत. जो उमेदवार महाविकास आघाडीसाठी योग्य असेल तो आम्हाला चाचपणी केल्यानंतर नेमका कसा ते कळेल, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.