सरकारकडून तरुणांना मिळणार 15000 रुपये, आजपासून ‘ही’ नवीन योजना सुरु; PM मोदींची घोषणा

ऑगस्ट 15, 2025 11:06 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२५ । ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १२ व्यांदा लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंगा फडकावला. याप्रसंगी पीएम मोदींनी तरुणांसाठी घोषणा केली आहे. त्यांनी देशातील तरुणांना खुशखबर दिली आहे.

pm modi

पीएम मोदी यांनी ‘पंतप्रधान विकसित भारत योजना’ सुरु करण्याची घोषणा केली आहे. यासाठी १ लाख कोटी रुपयांचा निधी वापरला जाणार आहे.आजपासून ही नवीन योजना सुरु झाली आहे. या योजनेचा कोट्यवधी तरुणांना फायदा होणार आहे.

Advertisements

या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी करणाऱ्या तरुणांना सरकारकडून पैसे दिले जाणार आहेत. पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना १५,००० रुपये दिले जाणार आहेत. यामुळे ३.५ कोटी तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्वासही मोदींनी यानिमित्ताने व्यक्त केला आहे.

Advertisements

पंतप्रधान मोदींनी सांगितले की, या योजनेअंतर्गत तरुणांना नवीन रोजगाराच्या संधी मिळतील. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना कार्यरत आहेत. महिलांसाठी लखपती दीदी योजना सुरु करण्यात आली आहे. यामुळे लाखो महिलांना मदत होणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीत सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा करणात आहे. यामध्ये नवीन जीएसटी सुधारणा आणणार आहेत. यामध्ये जीएसटी दराचा आढावा घेतला जाईल. यामुळे कर कमी होतील. जे खूप सोपे असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now