⁠ 
शुक्रवार, मे 10, 2024

Presidential Election 2022 : यशवंत सिन्हा असणार विरोधी पक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । Presidential Election 2022 । यशवंत सिन्हा असणार विरोधी पक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी हि बैठक झाली. त्यावेळी याची घोषणा करण्यात आली. जयराम रमेश, सुधींद्र कुलकर्णी, दीपंकर भट्टाचार्य, डी राजा, तिरुची शिवा (डीएमके), प्रफुल्ल पटेल, येचुरी, एनके प्रेमचंद्रन (आरएसपी), मनोज झा, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला, हसनैन मसूदी (नॅशनल कॉन्फरन्स) या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीला ओवेसी यांच्या पक्षाचे खासदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते. मागील बैठकीत AIMIM ला बोलावण्यात आले नव्हते. खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, गेल्या वेळी बोलावले नव्हते म्हणून ते आले नाहीत. बैठकीनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, आम्ही (विरोधी पक्षांनी) एकमताने यशवंत सिन्हा हेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे उमेदवार असतील असा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या बैठकीत सामील होण्यापूर्वी यशवंत यांनी ट्वीट केले होते की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मिळालेल्या सन्मान आणि प्रतिष्ठेबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ते पुढे म्हणाले की, आता पक्ष सोडून मोठ्या उद्देशासाठी काम करण्याची वेळ आली आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणीची तारीख 21 जुलै निश्चित करण्यात आली आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै 2022 रोजी संपत आहे.