जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२१ । जिल्ह्यात केवळ ८ गरोदर महिलांनीच लस घेतली असल्याचे वृत्त जळगाव लाईव्ह न्यूजने प्रकाशित केले होते. जळगाव लाईव्हच्या वृत्ताची दखल घेत प्रशासन कामाला लागले असून उद्या शहरातील ४ केंद्रांवर गरोदर महिलांना पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.
गरोदर महिलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचे निर्देश राज्य सरकारने दिल्यानंतर लसीकरण सुरू झाले आहे. जिल्ह्यात आजवर केवळ ८ गरोदर महिलांनी लस घेतली असून प्रशासनाची अनास्था आणि महिलांमध्ये असलेल्या भितीपोटी गरोदर महिला लस घेण्यास पुढे येत नसल्याचे वृत्त जळगाव लाईव्ह न्यूजने प्रकाशित केले होते. जळगाव लाईव्हच्या वृत्ताची दखल घेत प्रशासन कामाला लागले आहे.
शहर मनपा प्रशासनाकडून उद्या दि.९ रोजी शहरातील चेतनदास मेहता रुग्णालय सोडून इतर ४ ठिकाणी गरोदर महिलांना कोविशिल्डची लस दिली जाणार आहे. मनपा आरोग्य अधिकारी डॉ.राम रावलानी यांनी याची माहिती दिली आहे.