⁠ 
शनिवार, मे 18, 2024

हिंस्त्र प्राण्याचा हल्ला; गायीचा फडशा, वासरुसह ३ रानडुक्कर ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । कलाली ( ता. अमळनेर )  येथील शिवारात हिंस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात गजानन भादु पाटील ( वय माहीत नाही ) यांची एक गाय तर किशोर कोळी ( वय माहित नाही ) यांची वासरे असे दोन गुरे आणि तीन रानडुकरे ठार झाले असून, यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त डीवायएसपी मंगलसिंग सूर्यवंशी यांनी वनविभागाला माहिती दिली आहे.

सविस्तर असे की, अमळनेर तालुक्यातील कलाली येथील शिवारात काल हिंस्त्र प्राण्याने धुमाकूळ घातला. गजानन भादु पाटील यांच्या मालकीची गाय सायंकाळी परत नाही आली यावेळी त्यांनी सकाळी गाईचा शोध घेतला असता शेतात ही गाय मृतावस्थेत व लचके तोडलेले दिसली. तर अधिक शोध घेतला असता किशोर कोळी यांची वासरे देखील मृतावस्थेत व लचके तोडलेले आढळले याचबरोबर तीन रानडुकरांचा फडशा पाडलेला दिसला. गावालगत लेंढ्या नाल्याच्या जवळच्या शेतात ही गाय फरफटत नेली होती.

यामुळे मालकांनी तातडीने ही बाब सेवानिवृत्त डीवायएसपी मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या कानावर घातली व पायाचे ठसे मागवून त्यांनी वनविभागाला माहिती दिली आहे. त्यावरून वनविभागाने तातडीने दखल घेऊन लेंढ्या नाल्यात व जंगलात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार परिसरात बिबट्याचा वावर असण्याची शक्यता असून यामुळे या भागातील शेतकरी धास्तावले आहेत.