⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | गुन्हे | अ‍ॅड. प्रवीण चव्हाणांना ‘या’ अटी शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर

अ‍ॅड. प्रवीण चव्हाणांना ‘या’ अटी शर्तीवर अटकपूर्व जामीन मंजूर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । मराठा विद्याप्रसारक संस्थेतील कागदपत्र चोरी प्रकरणात संशयित आरोपी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांना न्यायालयाने अटी शर्तीवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात अ‍ॅड. विजय पाटील यांच्या जामीन अर्जावरही आज शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

19 जुलै 2021 रोजी मराठा विद्याप्रसारक संस्थेत बेकायदा घुसून दस्तऐवज चोरी करण्याच्या आरोपात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात संस्थेचे मानद सचिव नीलेश भोईटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात अ‍ॅड. विजय पाटील यांना अटक करून न्यायालयीन कोठडीत सोडण्यात आले होते. त्यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, परंतु तपासी अधिकाऱ्यांनी गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे सांगून 23 डिसेंबरपर्यंतची मुदत मागितली. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची मुदतवाढ देऊन आज शुक्रवारी जामीन अर्जावर म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.

दुसरीकडे, अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर बुधवारी युक्तिवाद झाला होता. गुरुवारी झालेल्या सुनावणीत पोलिसांनी जेव्हाही चौकशीला बोलावले तेव्हा हजर राहावे लागेल, या अटीवर त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. अ‍ॅड. गोपाळ जळमकर यांनी त्यांच्याकडून कामकाज पाहिले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.