जळगाव जिल्हा

मराविमं अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रवीण बागूल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मार्च २०२२ । महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे ४४ वे वार्षिक अधिवेशन पुणे येथे नुकतेच पार पडले. यात संघटनेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी प्रवीण बागूल यांची तर सरचिटणीसपदी संजय खाडे यांची निवड करण्यात आली.

तर संघटन सचिव प्रवीण काटोले, कार्याध्यक्ष किशोर बागूल (महावितरण), मंगेश शिंदे (महापारेषण), नंदकिशोर पांडे (महानिर्मिती), उपसरचिटणीस प्रणेश शिरसाठ (महावितरण), सतीश जाधव (महापारेषण), धीरज विसपुते (महानिर्मिती), कोषाध्यक्ष तुषार खैरनार, महिला प्रतिनिधी मंजुषा दुसाने (क्षेत्रीय कार्यालय), स्मिता बडे (सांघिक कार्यालय)

नवनिर्वाचित सरचिटणीस संजय खाडे म्हणाले की, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती व सूत्रधारी कंपनी अंतर्गत वित्त व लेखा, मानव संसाधन, माहिती व तंत्रज्ञान, औद्योगिक संबंध, जनसंपर्क, विधी, सुरक्षा व अंमलबजावणी आदी विभागातील अधिकाऱ्यांचे ही संघटना प्रतिनिधित्व करते. तिन्ही वीज कंपन्यांतील अतांत्रिक अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन कार्यकारिणी अधिक जोमाने प्रयत्न करणार आहे. यात अधिकाऱ्यांचे वर्क नॉर्म्स निश्चित करणे, सर्व अतांत्रिक अधिकार्‍यांच्या रखडलेल्या पदोन्नती पॅनलबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन) वेतननिश्चितीमधील तफावत दूर करणे, जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या अपग्रेडेशनबाबत प्रश्न निकाली काढणे, अंतर्गत भरती प्रक्रिया पुन्हा राबविण्याबाबत उपाययोजना करणे, लेखापरीक्षण पूर्वीप्रमाणेच लेखा विभागामार्फत सुरू करणे, महावितरण कंपनीस आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनास सर्वोतोपरी मदत करणे, वीज उद्योगास खाजगीकरणापासून रोखणे आदी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळामध्ये कामकाज करण्याचा मानस आहे, असे सरचिटणीस संजय खाडे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button