प्रतीक पवार हल्ल्याची चौकशी ‘एनआयए’कडे सोपवा – आ. निलेश राणे
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । कर्जत तालुक्यातील (जि. नगर) प्रतीक पवार या युवकावर समाज माध्यमांतून नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्यामुळे मुस्लीम युवकांनी केलेल्या हल्ल्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आ. नितेश राणे यांनी शनिवारी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पद्धतीचे हल्ले या पुढील काळात सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही आ. राणे यांनी यावेळी दिला. आ.राणे म्हणाले की, नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याप्रकरणी ४ ऑगस्टला अहमदनगर येथील कर्जत तालुक्यातील प्रतीक पवार या तरूणावर मुस्लीम तरूणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात पवार हा युवक गंभीर जखमी झाला. या हल्ला प्रकरणी फरार आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी ही त्यांनी केली.
नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर उदयपूर, अमरावती व आता कर्जत येथे घडलेली ही तिसरी घटना आहे. हिंदूवर वारंवारं हल्ले केले जात आहेत या पुढे हे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. धार्मिक भावना दुखवल्यावर घटनेचा जरूर निषेध करावा पण तो लोकशाही मार्गाने केला पाहिजे. शरीयत नुसार कायदा हाती घेऊन हिंदूंनां लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी नमूद केले. श्री. राणे म्हणाले की, भाजपाने नुपूर शर्मा यांच्या त्या व्यक्तव्याचे समर्थन केले नाही. त्यांना पक्षातून निलंबित केले. हा विषय आतासंपला असताना हिंदूवर असे हल्ले होत आहेत. हिंदु देव-देवतांची विंटबना केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत त्या प्रत्येक वेळी आम्ही लोकशाही मार्गाने अशा घटनांचा निषेध केला आहे. राज्यात मविआ सरकार नसुन हिंदुत्व जपणारे सरकार आहे, तेव्हा अशा प्रकारे हल्ले करण्याचे प्रयत्न कोणी करू नये.