⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 7, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | प्रतापराव पाटलांची संवेदनशीलता, अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात!

प्रतापराव पाटलांची संवेदनशीलता, अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले, जखमीला पाठवलं रुग्णालयात!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अपघातग्रस्त तरुणास मिळाले वेळेवर उपचार मिळाल्यामुळे भोद खुर्दच्या ग्रामस्थांनी मानले आभार

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२४ । माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांची संवेदनशीलता पुन्हा एकदा दिसून आली आहे. भोद खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील यांचे सुपुत्र राकेश यांचा जळगाव जात असतांना पाळधीजवळ अपघात झाला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव तथा माजी जि.प. सदस्य प्रतापराव पाटील हे घटनास्थळाजवळ पोहचले. त्यांनी अपघातग्रस्त तरुणास वेळेवर उपचार मिळण्यासाठी मदत केली.

प्रतापराव पाटील यांच्याकडून माणुसकीचं दर्शन
गुरुवार दि.२३ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भोद खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील यांचे सुपुत्र राकेश यांचा जळगावच्या दिशेने जात असतांना अपघात झाला होता. अज्ञात ट्रॅक्टर ट्रॉलीने दिलेल्या धडकेत कमरेला गंभीर दुखापत झालेली होती. याचवेळी प्रतापराव पाटील हे त्यांचे नित्याचे काम आटपून घरी जात होते. त्यांना अपघातग्रस्त तरुण पडलेला दिसला. त्यावर प्रतापराव पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करतांना तरुणास विचारपूस करून शरद पाटील यांचे मित्र पितांबर पाटील यांना फोन केला व तुमच्या मित्राचा एक्सीडेंट झालेला आहे, तुम्ही लवकर या. मी त्याला एक्सीडेंट हॉस्पिटलला, नेतो असा निरोप दिला व स्वतःच्या गाडीमध्ये त्यांनी व त्यांचे पीए गोकुळभाऊ यांना बसवले.

अपघातग्रस्ताला तरुणाला दिला धीर
प्रतापराव पाटील तरुणास हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी निघाले असता तोपर्यंत पितांबर पाटील यांचे लहान बंधू भोद खुर्दचे सरपंच तथा विजय मार्बलचे संचालक विजय पाटील व उपसरपंच व सुपर सेवा मार्टचे संचालक संदीप पाटील हे त्यांची कार घेऊन अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी सदर तरुणास लवकरात लवकर एक्सीडेंट हॉस्पिटलला पोहोचवले. यावेळी हॉस्पिटलला भोद खुर्दचे माजी सरपंच राजू बापू, पितांबर पाटील संदीप पाटील, दीपक पाटील, दूध फेडरेशनचे मॅनेजर आबासाहेब बाळू भास्कर पाटील यांनी भेट दिली व पुढील उपचाराची सोय केली. दरम्यान, वेळेवर उपचार मिळाल्याने राकेश पाटील यांची परिस्थिती आता समाधानकारक आहे. राकेश पाटील यांच्या कमरेत फॅक्चर झालेला असून किडनीलाही दुखापत झाली असल्याचे कळते. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी प्रतापराव पाटील जखमी तरुणासोबत संवाद साधत धीर दिला.

प्रतापराव पाटील हे नेहमीच अपघात ग्रस्तांना करतात मदत
प्रतापराव पाटील हे नेहमीच अपघात ग्रस्तांना मदत करताना दिसून येतात. महामार्गावर झालेला अपघात पाहताच प्रतापराव पाटील यांनी घेतलेली तातडीने धाव अनेकांना माणुसकीचे दर्शन देणारी ठरली होती. त्यांच्या समाजकार्यातील तत्परता व वेळीच केलेली मदतीमुळे एका अपघातग्रस्त तरुणास वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाला. याबाबत समस्त भोद खुर्दच्या ग्रामस्थांनी प्रतापराव पाटील यांचे आभार मानले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.