जळगाव जिल्हा

विधानसभा निवडणुकीत प्रजाशक्ती क्रांती दलाचा महायुतीला पाठींबा जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : येथे जी.एम. फाऊडेशनच्या कार्यालयात प्रजाशक्ती क्रांती दलाच्या वतीने भाजपा महायुतीस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पाठींबा जाहीर केला आहे. पाठिंब्याचे पत्र मंत्री भाजप नेते ना. गिरीश महाजन यांना आज गुरुवार, ७ नोव्हेंबर रोजी सुपूर्द करण्यात आले. हे पत्र प्रजाशक्ती क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. अशोराज तायडे यांच्या हस्ते देण्यात आले.

भारतीय जनता पक्षाला प्रजाशक्ती क्रांती दल संघटनेने पाठिंबा दिला आहे. यासोबतच त्यांनी काही मागण्यांचे निवेदन ना. गिरीश महाजन यांना दिले आहे. याप्रसंगी राष्ट्रीय सचीव अॅड. सतीष मोरे, राज्य अध्यक्ष डॉ. अमोल बावस्कर, प्रभारी राज्य महिला अध्यक्षा ज्योती पवार, मराठवाड विभागीय अध्यक्ष मजणु पठाण, उपाध्यक्ष अशोक कराळे, मराठवाडा विभागीय महिला अधक्षा भारती कदम, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, विभागीय महिला अध्यक्षा मीना रहेजा, विदर्भ विभागीय अध्यक्ष कैलाश निघोट, कोकण विभागीय अध्यक्ष धम्मपाल ठाकरे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अॅड. समीर तडवी , महामगर अध्यया प्रा. पंकज सपकाळे, गहिनीनाथ वाघ, गजानन काळे, यशंवत पडोळ, रेहाना शेख, कवीता बोरडे, निलेश जाधव, किशोर शिंदे, जिल्हा अध्यक्षा व पदा‌धिकरी उपस्थीत होते. हया वेळी पाठीब्यात प्रजाशक्ती कांती दलाच्या वतीने चार मागण्या पाठिंबा पत्रात करण्यात आल्या.

शेतमजुरांची नणना करणे. शेतमजुरांसाठी व त्यांच्या मुलांसाठी स्वंतत्र महामंडळ सुरु करणे. सरकारी दवाखान्याची ओ.पी.डी. बारा तास सतत सुरु ठेवणे. शेतकऱ्यांना चोविस तास विज उपलब्ध करुन देणे. अशा चार मागण्या पाठीबा पत्रात करण्यात आल्या आहेत. या मागण्या लोकांभिमुख असून महायुतीचे सरकार आल्यास त्या पूर्ण करण्याचे आश्वासन महायुतीकडुन भाजपचे जेष्ठ नेते ना. गिरीश महाजन यांनी दिले. महायुतीचे सरकार हे गोर गरिबांचे सरकार असून लाडकी बहीन योजना ही माय-माऊलीसाठी संजीवनी असल्याचे प्रा.अशोराज तायडे वेळी सांगितले. प्रजाशक्ती क्रांती दल है राष्ट्रीय संघटन असून राज्यात ३ लाख ५० हजाराहून अधिक सक्रीय कार्यकर्ते या संघटनेत आहेत. हे सर्व कार्यकर्ते व पदाधिकरी हे मोठ्या ताकदीने विधानसभा निवडणुकीत महायुती सोबत असतील असा विश्वास प्रा. अशोराज तायडे यांनी वेळी व्यक्त केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button