⁠ 
सोमवार, मे 20, 2024

फक्त 1 रुपया दरमहिना खर्च करा अन् 2 लाखांचा फायदा मिळवा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२१ । आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीसाठी विमा ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे. मात्र गरीब कुटुंबांना विम्याचा हप्ता भरणे खूप कठीण जाते. मात्र, अशा गरीब कुटुंबांसाठी केवळ 1 रूपया महिना भरून इन्श्युरन्स योजना केंद्र सरकारने आणली आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) असे तिचे नाव आहे.

या योजनेअंतर्गत (PMSBY) 2 लाख रुपयांपर्यंत अपघाताचे कवच वार्षिक 12 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. म्हणजेच दरमहा फक्त 1 रुपया खर्च करून 2 लाखांचा फायदा मिळवता येणार आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही. तुमच्या बँक खात्यातून ते आपोआप कापले जाते.

कसं करायचं रजिस्ट्रेशन?

– सरकारच्या या योजनेत नोंदणी करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेला भेट देऊन अर्ज करू शकता.

– तुम्हाला हवे असल्यास तुम्ही विमा एजंटशी संपर्कही साधू शकता. सरकारी आणि खासगी विमा कंपन्या बँकांच्या सहकार्याने ही सेवा देतात.

PMSBY चे वार्षिक प्रीमियम फक्त 12 रुपये आहे म्हणजे फक्त 1 रुपये दरमहा आहे. दरवर्षी 31 मे पूर्वी प्रीमियमची रक्कम तुमच्या बँक खात्यातून आपोआप वजा केली जाईल आणि तुम्हाला 1 जून ते 31 मे या कालावधीसाठी संरक्षण मिळेल. या योजनेअंतर्गत विमाधारक व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाला किंवा तो पूर्णपणे अपंग झाला तर त्याला 2 लाख रुपयांचा अपघात विमा मिळतो.

योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? :

वयाची 70 वर्षे ओलांडल्यावर कव्हर समाप्त होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेत खाते असणे आवश्यक आहे. तसेच 31 मे रोजी खात्यात शिल्लक असणे आवश्यक आहे म्हणजेच प्रीमियमच्या कपातीदरम्यान. बँक खाते बंद केल्यास पॉलिसी रद्द होईल.