जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । तालुक्यातील कन्हेरे,फाफोरे,बिलखेडे गावांच्या ग्रुप विकास सोसायटी वर परिवर्तन पॅनलने सत्ता स्थापन करून चेअरमनपदी भय्यासाहेब भगवान पाटील तर व्हाईस चेअरमनपदी महादू चिंतामण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अमळनेर तालुक्यातील कान्हेरे, फाफोरे, बिलखेडे गावांच्या ग्रुप विकासच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलला यश मिळाले असून त्यांना सत्ता स्थापन करता आली आहे.निवडीवेळी मधुकर पाटील,गोविंदा पाटील,अर्जुन पाटील,नाना पारधी,लताबाई पाटील हे नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. यावेळी पॅनल प्रमुख अरुण पाटील,गटनेते अभिमन्यू पाटील यांची विशेष उपस्थिती होती,धनराज पाटील,रवींद्र पाटील,संजय पाटील,गणेश पाटील,वीरभान पाटील, दादाभाऊ पाटील, जिजाबराव पाटील, राजू पाटील योगेश पाटील,शशिकांत पाटील,सुनील पाटील,ज्ञानेश्वर पाटील,पिटु पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. |